Ads Area

Maharashtra Geography Questions | महाराष्ट्राचा भूगोल माहिती



★ महाराष्ट्राविषयी माहिती ★


▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (1646 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई

▪️उपराजधानी - नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36

▪️महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.

▪️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▪️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

▪️महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

▪️विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.

▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.

▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

▪️ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

▪️महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

▪️परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

▪️पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

▪️कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

▪️महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

▪️ जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

▪️भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

▪️रायगड जिल्ह्यात - कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.


!! आदिवासी जमाती !!

महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. 

कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या केंद्र शासनाने म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत

आदिवासी जमातीची सर्वात जास्त संख्या (सर्वात जास्त ते कमी) 
==> भिल्ल- (२१.२%), 
==> गोंड- (१८.१%), 
==> महादेव कोळी-(१४.३%), 
==> वारली- (७.३%), 
==> कोकणा- (६.७%)  
==> ठाकूर- (५.७%)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area