केंद्रीय शासन व्यवस्था
1. राष्ट्रपती हे आपल्या देशाचे प्रथम नागरिक आहेत.
2. राष्ट्रपतीपेक्षा कोणतेही पद भारतात श्रेष्ठ मानले जात नाही.
3. राष्ट्रपती पद हे संसदेचे तिसरे सदन म्हणून ओळखले जाते.
4. राष्ट्रपती हे भारताचे घटनात्मक प्रमुख असून त्यांना घटनेने विस्तृत अधिकार बहाल केलेले आहेत.
5. राष्ट्राच्या सर्व कार्यकारी शक्ती राष्ट्रपतीला प्राप्त झालेल्या आहेत.
6. राष्ट्रपती हे संसदेच्या कोणत्याही गृहाचे सभासद नसतात.
7. ते भारताचे सरसेनापती आहेत. सैन्यविषयक सर्व अधिकारी त्यांना प्राप्त झाले आहेत.
8. राष्ट्रपतीला आपले अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरावे लागतात.
राष्ट्रपतीची निवडः
1. पात्रता: 1. तो भारताचा नागरिक असावा.,
2. त्याच्या वयाला पस्तीस वर्षे पूर्ण झालेली असावीत.,
3. संसदेने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता निश्चित केलेल्या
अटी त्याने पूर्ण कराव्यात.,
4. राष्ट्रपती पदाकरिता अर्ज भरणाऱ्या व्यक्तीला किमान
पन्नास संसद सदस्यांचे अनुमोदन असणे
आवश्यक आहे.,
5. वेळोवेळी संसदेने कायदा करून निश्चित केलेल्या अटी त्याने
पूर्ण कराव्यात.
2. निवडणूक :
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील
मतदानाचा हक्क असणारे सदस्य व राज्य
विधानसभेतील मतदानाचा हक्क असणारे
सदस्य भाग घेतात.
3. शपथविधी:
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या व्यक्तीला
आपले पद धारण करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशापुढे पद व
गोपनियतेची शपथ घ्यावी लागते.
4. पदविमुक्ती:
1. आपला कार्यकाल संपण्यापूर्वी राष्ट्रपती आपल्या पदाचा
राजीनामा देऊ शकतात. असा राजीनामा राष्ट्रपतीने स्वतःच्या हस्ताक्षरात उपराष्ट्रपतीलासादर करणे आवश्यक आहे. उपराष्ट्रपती हा राजीनामा लगेच लोकसभेच्या सभापतीकडे
पाठवितो व उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून पद धारण करतो. उपराष्ट्रपती जास्तीत
जास्त सहा महिन्यांपर्यंत राष्ट्रपतीपद धारण करू शकतात.
2. खालील परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीला
आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो
किंवा देता येतो.
क) संसदेत राष्ट्रपतीवर महाभियोग चालवून
जर तो संमत झाल्यास.
ख) राष्ट्रपतीला स्वेच्छेने आपल्या पदाचा
राजीनामा देता येतो.
5. राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते :
1, राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते निश्चित करण्याचा अधिकार
संसदेला आहे, परंतु संसदेने एकदा ठरविलेले वेतन व भत्ते राष्ट्रपतीच्या
कार्यकालात कमी करता येत नाहीत.
2. सध्या राष्ट्रपतीला मासिक 5 लाख रुपये वेतन मिळते.
6. राष्ट्रपतीपदाचे विशेषाधिकार :
राष्ट्रपती त्याच्या कार्यकालात जी जबाबदारी पार पाडतो. ती जबाबदारी पार पाडत असताना झालेल्या चुकीबद्दल त्यांच्यावर देशातील कोणत्याही न्यायालयात खटला दाखल करता येत नाही किंवा न्यायालयाला त्यांच्या विरुद्ध पकड वारंट काढता येत नाही किंवा त्याला कैद करता येत नाही.
भारताचे उपराष्ट्रपती
1. उपराष्ट्रपती हे देशाचे दुसरे नागरिक म्हणून ओळखले जातात.
2. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असून त्यांना राज्यसभेच्या कामकाजात भाग घेता येते; परंतु मतदान करता येत नाही.
3. राष्ट्रपतीपद रिक्त झाले तर त्या ठिकाणी उपराष्ट्रपती कार्यकारी राष्ट्रपती म्हणून
कामकाज बघतात.
4. उपराष्ट्रपतीला जास्तीत जास्त सहा महिने राष्ट्रपतीपद धारण करता येते. अशावेळी
उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतीचे अधिकारी, वेतन व भत्ते प्राप्त होतात.
5. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोनही सभागृहातील मतदानाचा
हक्क असणारे सदस्य भाग घेतात.
6. उपराष्ट्रपतींना आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीपुढे पद व गोपनियतेची
शपथ घ्यावी लागते.
7. उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो.
8. उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतीच्या नावे आपला राजीनामा देता येतो किंवा त्यास महाभियोग
खटल्याद्वारे पदावरून दूर करता येते.
भारताचे पंतप्रधान
1. संविधानानुसार राष्ट्रपतीला सल्ला देण्याकरिता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली
मंत्रिमंडळ निर्माण करण्यात आलेले आहे.
2. पंतप्रधान राष्ट्रपती व मंत्रिमडळ यांच्यातील दुवा मानले जातात.
3. संविधानाने राष्ट्रपतीला प्रदान केलेल्या अधिकाराचा प्रत्यक्ष वापर पंतप्रधान करतात.
त्यामुळे पंतप्रधान हे भारताचे वास्तविक शासक आहेत.
4. ज्या व्यक्तीस लोकसभेमध्ये बहुमताचा पाठिंबा आहे, अशा व्यक्तीची राष्ट्रपती
पंतप्रधानपदी नेमणूक करतात आणि इतर मंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती पंतप्रधानांच्या
सल्ल्यानुसार करतात.
5. पंतप्रधान पदाकरिता नेमण्यात येणारी व्यक्ती संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही एका
गृहाचा सदस्य असला पाहिजे.
6. पंतप्रधान व मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेस जबाबदार असते. जर लोकसभेने
मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव पास केला तर मंत्रिमंडळास आपल्या पदाचा राजीनामा
द्यावा लागतो.


If you have any doubt, please let me know